आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

किरकोळ वादातून पिंपरीत दोघांची हत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पिंपरी व पुनावळे परिसरात दोन वेगवेगळ्या घटनांत किरकोळ वादातून दोघांची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. धीरेंद्र कुमार (२४ रा. उत्तर प्रदेश), मंगेश निकम (२४) अशी मृतांची नावे आहेत.

पुनावळे येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू असून तिथे कामगारांत झालेल्या वादात धीरेंद्र कुमार याच्या डोक्यात राजू क्षेत्री (२५, रा. काठमांडू) याने धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला. दोघेही इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये पीओपीचे काम करत होते. त्यावेळी दोघांत झालेल्या भांडणातून रागाच्या भरात राजूने धीरेंद्रवर हल्ला करून त्याला ठार केले, तर दुस-या घटनेत पिंपरीतील नेहरूनगर येथे एका दुचाकीच्या पेट्रोल टाकीत साखर टाकल्याचा संशयावरून मंगेश निकम या युवकाचा खून करण्यात आला.
याप्रकरणी पोलिस आकाश शिंदे याचा शोध घेत आहेत.