आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुशी धरणात मुंबईचे दोन युवक बुडाले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - लोणावळ्याच्या भुशी धरण जलाशयात मुंबईच्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. भूपेन धीरज भंडारी (२०, रा. अंधेरी, मुंबई) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे, तर अनिकेत हांडे याला शोधण्याचे काम सुरू असल्याचे लोणावळा पोलिसांनी सांगितले.
मुंबईतील १३ मित्रांचा ग्रुप रविवारी सकाळी लोणावळ्यात गेट टू गेदरसाठी आला होता. भुशी धरण परिसरात आल्यावर सकाळी अकराच्या सुमारास भूपेन आणि अनिकेत हे दोघे पोहता येत नसतानाही जलाशयात उतरले. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. पोलिस, ग्रामस्थांनी शोधमोहीम सुरू केल्यावर दुपारी भूपेनचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. अनिकेतचा शोध सुरू आहे. दरम्यान, भुशी धरण परिसरात जलाशयात उतरलेल्या चार जणांचा गेल्या आठवड्यात मृत्यू झाला होता.