आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Udayan Raje Bhosale Comment On Ramraje Nimbalkar In Satara

लाल दिव्यासाठी रामराजे जिल्हाही विकून टाकतील - उदयनराजे भोसले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा - ‘विधान परिषदेचे सभापतिपद सातारा जिल्ह्याला मिळाले तेव्हा मला अानंदच झाला हाेता. मात्र, शिवाजीराव देशमुखांसारख्या संवेदनशील माणसाला पायउतार करून रामराजे निंबाळकर यांच्यासारख्या व्यक्तीला हे पद देणे चुकीचेच आहे. सत्तेसाठी हुजरेगिरी करणारे रामराजे लाल दिव्यासाठी जिल्हा गहाण ठेवतील, प्रसंगी विकूनही टाकतील,’
असा घणाघाती प्रहार राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी केला.

सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचे दोन परस्परविरोधी गट असलेले भोसले व निंबाळकर यांच्यात गेल्या दोन- तीन दिवसांपासून चांगले वाक‌्युद्ध रंगले आहे. भोसले यांनी निंबाळकरांच्या निवडीला विरोध केल्यामुळे त्यांच्या समर्थकांत संताप आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी निंबाळकर यांनी भोसले यांना ‘छत्रपतींसारखे वागा, मी तुम्हाला उजव्या पायाने मुजरा करीन,’ असा सल्ला दिला होता. तसेच ‘त्यांचा आणि पाण्याचा संबंध फक्त दारूपुरताच असतो’ अशी टीकाही केली होती. निंबाळकरांच्या या वक्तव्याने भोसले समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली होती.
मंगळवारी या कार्यकर्त्यांनी निंबाळकरांच्या पुतळ्याचे दहनही केले. एवढ्यावरच न थांबता उदयनराजेंनी पत्रकार परिषद घेऊन निंबाळकरांना चोख प्रत्युत्तरही दिले. ‘रामराजेंच्या उजव्या पायाने मुजरा करण्याच्या कलेला दाद देत किंवा प्रभू रामचंद्राने सगळी बुद्धी रामराजेंना दिल्याचे समजून शरद पवार यांनी त्यांना सभापतिपद दिले असावे. खरे तर रामराजेंची पक्षातून हकालपट्टीच व्हायला पाहिजे होती,’ असे परखड मतही त्यांनी व्यक्त केले.
पवारांनाही टोला
‘मोकळ्या धरणांचा विषय काढला की एक जण मी त्यात *** करू का, असे विचारतो. तर हे राजे सगळे कोळून पितात. त्यामुळे अशा लोकांना पक्षातून काढूनच टाकले पाहिजे, अशी माझ्यासह अनेकांची मागणी आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनात रामराजेंविरोधात अशी अनेक प्रकरणे येणार आहेत, त्याला उत्तर कोण देणार? त्यापेक्षा त्यांना सभापतिपदावरून काढणेच योग्य राहील, अन्यथा मला जनतेनेच अशा भ्रष्ट लोकांची थडगी बांधण्याचे कंत्राट दिले आहे,’ असा खणखणीत इशाराही उदयनराजेंनी दिला.