आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Uddhav Thackeray At Tuljapur For Pray Of Tulajabhavani Mata

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'महाराष्ट्रावर भगवा फडकू दे\'; उद्धव ठाकरेंचे तुळजाभवानीला साकडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुळजापूर- शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी अडीचच्या सुमारास तुळजापूरात जाऊन तुळजाभवानीचे दर्शन घेतले. महाराष्ट्रावर भगवा फडकू दे, असे साकडे उद्धव ठाकरेंनी तुळजाभवानीला घातले.
उद्धव ठाकरे आज सकाळी 12 च्या सुमारास तुळजापूरात दाखल झाले. त्यानंतर काही वेळ विश्रांती घेऊन ते दुपारी एकच्या सुमारास मंदिराकडे रवाना झाले. दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान त्यांनी मनोभावे मां जगदंबा तुळजाभवानीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर माध्यमांनी त्यांनी बोलते करण्याचा प्रयत्न केला मात्र उद्धव यांनी फारसे बोलण्यास नकार दिला. युतीबाबत चर्चा सुरु आहे. मां तुळजाभवानी सर्व काही सुरळित पार पाडेल असे उद्धव ठाकरेंनी सांगितले.