आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीशी सेटिंग करणा-या शेकापला पुढील पिढ्या माफ करणार नाहीत - उध्दव ठाकरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- शेतकरी, कामगारांवर अन्याय करणारे हे आघाडी सरकार उलथून टाकण्याची वेळ आली आहे. तुम्ही वेळ अजूनही गेलेली नाही. तसेही आमचे सरकार येणारच आहे. तुम्ही तुमच्या नावाचा तरी विचार करावा. मात्र, जर तुम्ही राष्ट्रवादीशी सेटिंग करून आमच्या सरकारला मांजरासारखे आड आलात तर शेकापला शेतकरी, कामगार आणि त्यांच्या पुढच्या पिढ्या कधीच माफ करणार नाहीत, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शेतकरी कामगार पक्षाला दिला आहे.
मावळ लोकसभेचे शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-स्वाभीमान शेतकरी संघटना महायुतीचे उमेदवार आप्पा उर्फ श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ रविवारी रसायनी येथील मोहपाडा मैदान येथे भव्य सभा पार पडली. त्यावेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित श्रोत्यांमुळे मोहपाडा मैदान फुलून गेले होते. त्यावेळी उध्दव ठाकरे बोलत होते. यावेळी रामदास आठवले, शशिकांत सुतार, नीलम गो-हे, विजय शिवतरे आदी उपस्थित होते.
उध्दव ठाकरे म्हणाले की, अब की बार, मोदी सरकार, ही गरज आहे. देशात सध्या कोण कारभार करतेय, हेच समजत नाही. संकट आल्यावर कोण उभे राहणार? पंतप्रधान स्वत: काही न बोलता व्हॉटस्‌ अॅपप्रमाणे गप्पच असतात. देशात पंतप्रधान म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज आहे. इंदिरा गांधी, राजीव गांधी पंतप्रधान झाले. नंतर सोनिया गांधी आणि शरद पवारांनाही पंतप्रधान व्हायचे होते. मात्र, आता राहुल गांधी शक्य नाही. मग कोण? लालू बाशिंग बांधून बसले आहे. लालूंचे नाव आल्यावर गुरं-ढोरं घाबरतात. कारण, त्यांना भिती आहे की, अन्न सुरक्षा कायदा आणून काँग्रेसने सर्वसामान्याचे अन्न पळवले. एकदा लालू पंतप्रधान झाले तर चारा खाईल. शरद पवारांनी मोदींची चेष्टा करताना 'उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग', अशी केली. पण, पवार साहेब राजकारण आहे. मोदी निदान बाशिंग बांधून घोड्यावर तरी बसले. तुमचे काय? असा सवाल करीत त्यांनी खरपूस टीका केली.
पुढे वाचा, उद्धव यांनी आणखी कोणा-कोणावर टीका केली...