आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'राष्ट्रवादी सत्तेसाठी लाचार, पवार काका-पुतणे दिसले की लोक पैसे लपवतात\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजगुरूनगर (पुणे)- 'राष्ट्रवादी' विचार घेऊन शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले तरी सत्तेसाठी ते त्यांच्यापुढे लाचार झाले. सत्तेतील खुर्चीला लाथ मारली तर काँग्रेसवाले पवारांची चौकशी लावतील. त्यामुळे ते सत्तेतून बाहेर पडू शकत नाहीत तसेच त्यांच्यात ती धमकही नाही असा घाणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांवर केला. शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा कुणीही उमेदवार असला, अगदी शरद पवार उभे राहिले तरी त्यांचेही डिपॉझिट घालवण्याचा निर्धार करा, असेही आवाहन केले. राजगुरूनगर येथे रविवारी झालेल्या सभेत ठाकरे यांनी पवार काका-पुतण्यावर जोरदार हल्लाबोल करीत समाचार घेतला.
उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यात निर्णय नसल्याने मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा भरलाय का असे शरद पवार विचारतात. मग माझा त्यांना प्रश्न आहे की, हा लकवा भरलेला हात तुम्ही हातात का धरता? तुमची भांडणे जागावाटपात तुला किती मला किती यासाठी आहेत. जनतेच्या प्रश्‍नांचे काँग्रेस-राष्ट्रवादीला काही एक पडलेले नाही आणि जनतेत राज्य सरकारची आता रुपयाची देखील पत उरली नाही.
पुढे वाचा, पवार काका-पुतणे दिसले की लोकं आपल्या जवळचे पैसे लपवतात...