पुणे- भाजपचे पक्षाध्यक्ष
अमित शहांनी औरंगाबादच्या सभेत सांगितलेल्या उंदराच्या गोष्टीला शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्त्युत्तर दिले आहे. ज्या आदिल शहाने शिवाजी महाराजांना उंदराचे पिल्लू म्हटले होते. त्याच आदिलशहांना शिवाजी महाराजांनी कशी अद्दल घडविली होती हे माहित आहे का? असा सवाल करीत येत्या निवडणुकीत राज्यातील जनता
आपल्या वाघनखी हाताने महाराष्ट्र तोडणा-यांचा कोथळा बाहेर काढील असे सांगितले.
उद्धव ठाकरेंनी भोसरीच्या शिवसेनेच्या उमेदवार सुलभा उबाळे यांच्या प्रचारार्थ भोसरीत सभा घेतली. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार टीकास्त्र सोडताना अमित शहांना लक्ष्य केले. अमित शहांनी औरंगाबादमधील सिल्लोड येथे काल जाहीर सभेत एक उंदराची गोष्ट सांगितली होती. त्याला उद्धव ठाकरेंनी उत्तर दिले.