आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uddhav Thackeray Reached At Karla With His Parties 63 Mla

महाराष्ट्रात रयतेचे राज्य आणून 180 आमदारांसह एकविरेला येईन- उद्धव ठाकरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र: उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी व मुलगा आदित्यसह आज कार्ल्यातील एकविरा देवीचे दर्शन घेतले)
पुणे- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील रयतेचं राज्य आगामी काळात महाराष्ट्रात पाहायला मिळेल. आज एकविरा देवीला 63 आमदार घेऊन आलोय लवकरच 180 आमदार घेऊन येईन, असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी व मुलगा आदित्यसह आज सकाळी 12 च्या सुमारास लोणावळ्याजवळील कार्ल्यात दाखल झाले. याचबरोबर विधानसभेत निवडून आलेले सर्व 63 आमदारांना घेऊन विशेष व्हॉल्वो बस कार्ल्यात पोहचली. उद्धव व आमदारांसह शिवसेनेचे इतरही बडे नेते एकवीराच्या दर्शनाला पोहचले. त्याआधी आज सकाळी सर्व आमदार शिवाजी पार्कवर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला व मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन कार्ल्याला रवाना झाले होते.
एकविरा देवीचे दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले, आई एकविरा देवी आमची कुलदैवत आहे. शिवसेना जेव्हा जेव्हा कोणत्याही कामाची, चांगल्या गोष्टीची सुरूवात करते तेव्हा आम्ही आई एकविरा देवीकडे आशीर्वाद मागतो. यंदाच्या निवडणुकीतही एकविरा आईच्या कृपेने 63 आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांच्यासह आशीर्वाद मागण्यासाठी व नवस फेडण्यासाठी आलो आहे. मागील 25 वर्षापासून जेव्हा जेव्हा शिवसेनेचे आमदार-खासदार निवडून आले त्या सर्वांनी एकविरा देवीचे दर्शन घेतलेले आहे.
खासदार अनिल देसाई यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, भाजपाच्या सत्तेत सहभागी होण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरु असून लवकरच याबाबत तुम्हाला माहिती कळेल असे सांगितले.