आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Udhao Thackeray Criticize Ruling Party Political Leaders Of Maharashtra

आता गुढीच्या काठीवर रेशनची पिशवीच लटकवावी लागेलः उद्धव ठाकरेंची टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना वैचारिक पंख दिले. गरुडाचेच पंख होते ते. आताचे राज्यकर्ते तकलादू आहेत. त्यांचे वर्तन ठीक नाही. पाडव्याची गुढी उभारायची म्हटले तर काठीवर रेशनची रिकामी पिशवी लटकवावी लागेल, अशी वेळ त्यांनी जनतेवर आणली आहे,’ अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी राज्यातील आघाडी सरकारच्या कारभाराचा समाचार घेतला.

बाळासाहेब ठाकरे यांना जाहीर झालेला राष्ट्रभूषण पुरस्कार उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पुण्यात स्वीकारला. त्यानंतर ते बोलत होते. बाबा, दादा, आबा ही विशेषणे मराठी संस्कृतीमध्ये आदराने, आपुलकीने घेतली जातात. आजचे राज्यकर्तेही याच नावाने ओळखले जातात, परंतु ही जिव्हाळ्याची विशेषणे लावण्याची त्यांची लायकीच नाही, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना लगावला. बाळासाहेबांच्या वतीने पुरस्कार स्वीकारताना त्यांचा मुलगा म्हणून मला अभिमान वाटत आहे. भाकड लोकशाहीवर त्यांचा विश्वास नव्हता. त्यांची उणीव सतत भासणार आहे. देशाचे गृहमंत्री जाहीरपणे भगव्या दहशतवादाचा उल्लेख करतात. बाळासाहेब असते तर हिंदूंना अतिरेकी म्हणण्याचे धाडस त्यांना झाले नसते, असेही उद्धव म्हणाले.