आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Udhav And Aditya Thackeray In Dyaneshwar Maharaj Palakhi

ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात हरिनामाच्या गजरात रंगले ठाकरे पिता-पू‍त्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- हातात भगवा पताका घेऊन ज्ञानेश्वर माऊलीच्या वारीत सहभागी झालेले वारकरी टाळ-मृदुंगाच्या गजरात पांडूरंगाच्या भक्तीरसात चिंब झाले आहेत. माऊलीची पालखीने आज (सोमवारी) आळंदीहून श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात शिवसेना पक्ष अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरं‍जीव आदित्य ठाकरेही रंगून गेले.

ठाकरे पिता-पूत्र आळंदी रोडवरील चरोली ते श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरापर्यंत पायी सहभागी झाले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पादुकांचे पूजन करण्‍यात आले.

उद्धव ठाकरे यांनी हातामध्ये टाळ घेऊन हरिनामाचे भजन करीत वारकरी बांधवासोबत उत्साहाने सहभागी झाले . यादरम्यान त्यांनी पालखीमधील अश्वाचे दर्शन घेतले . वारीमध्ये सहभागी झालेल्या एक बाल वारकर्‍यांने आपल्या मोबाइलमध्ये उद्धव ठाकरेंची छबीही टिपली.

शिवसेना नेते गजानन किर्तीकर, मिलिंद नार्वेकर, आदेश बांदेकर, आमदार विजय शिवतारे, आमदार महादेव बाबर, आमदार चंद्रकांत मोकाटे, भारतीय कामगार सेना महाराष्ट्र सरचिटणीस रघुनाथ कुचिक, राष्ट्रीय माथाडी कामगार सेना पुणे शहराध्यक्ष मंगेशदादा चंद्रमौर्य, शिवसेना नेते बाबासाहेब धुमाळ, भारतीय कामगार सेना पुणे जिल्हा अध्यक्ष उमेश चांदगुडे, किसन महाराज तापकीर, शिवसेना पुणे महापलिका शिवसेना गटनेते अशोक हरणावळ, शिवसेनेचे माजी नगरसेवक शाम देशपांडे, शिवसेना पिंपरी चिंचवड शहरप्रमुख भगवान वाल्हेकर, नगरसेवक श्रीरंग बारणे, नगरसेविका सुलभा उबाळे आणि शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्यासंख्येने वारीत सहभागी झाले होते.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... 'भक्तीरसात चिंब झालेले उद्धव ठाकरे'