आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्याच्या ऐतिहासिक फर्ग्युसन महाविद्यालयास स्वायत्त दर्जा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईस) फर्ग्युसन महाविद्यालयास विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) वर्षांची स्वायत्तता दिली आहे. यामुळेे महाविद्यालयात यंदापासूनच पदवी पदव्युत्तर स्तरावरील बदल केले जातील.

विद्यार्थ्यांच्या विद्यापीठाच्या पदवीवर आता फर्ग्युसन महाविद्यालयाचे नाव असेल. इतर सर्व तरतुदी विद्यापीठाच्या संरचनेनुसारच असतील. कौशल्याधारित किंवा पूरक जादा विषयांसाठी जादा शुल्क घेण्याची मुभा असेल, अशी माहिती डीईएस नियामक मंडळाचे उपाध्यक्ष विकास काकतकर यांनी दिली आहे.

उज्ज्वल परंपरा :लोकमान्य टिळक, गोपाळ आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर आदींच्या पुढाकारातून १८९५ मध्ये फर्ग्युसन महाविद्यालय सुरू झाले. म. गांधी यांचे गुरू गोपाळकृष्ण गोखले, रँग्लर परांजपे हे येथे शिक्षक होते. स्वा. सावरकर, एस. एम. जोशी, ग. प्र. प्रधान, माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग, पी. व्ही. नरसिंह राव, राम गणेश गडकरी, , प्र. के. अत्रे, पु. ल. देशपांडे, भालचंद्र नेमाडे, डॉ. श्रीराम लागू, स्मिता पाटील आदी मान्यवर येथेच शिकले आहेत.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...