आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ullas Hiremath Selected For Congress Session Phelioship

अमेरिकन सिनेट सदस्यांना हिरेमठ करणार मार्गदर्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - अमेरिकेतील सिनेट व काँग्रेस सदस्यांना शासकीय योजना ठरवताना अभियांत्रिकीविषयक सल्ला देण्यासाठी उल्हास हिरेमठ या पुणेकर व्यक्तीची काँग्रेस सेशनल फेलोशिपसाठी निवड झाली आहे. अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरतर्फे त्यांची पुढील एक वर्षासाठी निवड करण्यात आली असून ते व्हाइट हाऊसमध्ये काम करणार असल्याची माहिती डॉ. जगदीश व डॉ. शिरीष हिरेमठ यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना हिरेमठ म्हणाले की, अभियांत्रिकी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, विज्ञान-तंत्रज्ञान आदी विषयांतील 35 जणांची सल्लागारपदी निवड करण्यात आली आहे. यात तीन भारतीयांचा समावेश असून ही देशाच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे. अमेरिकन सिनेटर्ससोबत काम करून त्यांना टेक्निकल सल्लागार म्हणून मी काम करणार आहे.
डॉ. जगदीश म्हणाले, उल्हास यांनी पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग शाखेतील डॉक्टरेट डिग्री मिळवली असून ते मागील 30 वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्यास आहेत.