आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘स्ट्राइक’चे पुरावे मागणाऱ्यांनी पाकचेच नागरिकत्व घ्यावे, उमा भारतींचे निरुपम यांना प्रत्युत्तर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘उरीतील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने नियंत्रण रेषा अाेलांडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये ‘सर्जिकल स्ट्राइक’ करत ३८ अतिरेक्यांचा खात्मा केला. या कारवाईबाबत काेणी पाकिस्तानला पुरावे देण्याची मागणी करत असतील तर त्यांनी पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारावे,’ असे प्रत्युत्तर केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांचे नाव न घेता दिले. निरुपम यांनी ‘सर्जिकल स्ट्राइक’चे पुरावे देण्याची मागणी भाजपकडे केली हाेती.

खडकवासला धरणातील गाळ काढून त्याची साठवण क्षमता वाढविण्याचा तसेच धरणाच्या काठी वनीकरण करण्याबाबत ग्रीन थम्ब संस्थेच्या उपक्रमाची पाहणी करण्यासाठी पुण्यात अाल्या असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भारती म्हणाल्या, ‘देशभरातील नद्या, तलावात गाळाचे प्रमाण २० टक्के असल्याने पाणीसाठ्याला मर्यादा येत अाहे. दुष्काळी लातूरचे धरण असाे वा अाेडिशातील हिराकुंड धरण, ही धरणे गाळाने प्रभावित झालेली अाहेत. शासनाला अशा प्रकारची कामे करताना काही बंधने अाहेत. त्यामुळे राज्य सरकारने ही कामे काेणत्या याेजनेनुसार करता येतील याबाबत अहवाल दिल्यास ती करता येऊ शकतील.’

चांगल्या गाेष्टीत घ्यावा समाजाने पुढाकार
सध्याच्या घडीला केंद्राकडे तलाव स्वच्छतेबाबत याेजना तयार नाही. राज्य सरकारने त्याबाबत पाठपुरावा केल्यास त्यांना पर्यावरण मंत्रालयाकडून निधी उपलब्ध हाेऊ शकेल. शासनाला कामे करण्याची माेकळीक नसून ‘माहिती अधिकार’सारखी काही लक्ष्मणरेषा अहे. मात्र, समाजाला काेणतीही बंधने नसून त्यांनी ठरवल्यास ते काेणतेही काम तडीस नेऊ शकतात. शासनापेक्षा समाज माेठा असून तेच सरकार व नेता असल्याने त्यांनी चांगल्या उपक्रमांसाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे मतही उमा भारती यांनी व्यक्त केले.
बातम्या आणखी आहेत...