आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संयुक्त राष्ट्राने पाकिस्तानवर बहिष्कार टाकावा : गडकरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पाक जवानांनी भारतीय सैनिकांची केलेली हत्या घृणास्पदच आहे. तसेच पाकिस्ताने सरकारने याबाबत खेदही व्यक्त केलेला नाही. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करत असून त्याविरोधात पंतप्रधानांनी कठोर भूमिका घ्यावी व संयुक्त राष्ट्राने या देशावर बहिष्कार टाकावा, असे मत भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आयोजित कार्यक्रमासाठी ते पुण्यात आले होते. गडकरी म्हणाले, पाकच्या वृत्तीमुळे जनतेत क्रोध आहे. पंतप्रधानांनी त्यांच्यासोबत चर्चा करताना ठरावीक वेळमर्यादा आखून द्यावी. तसेच कोणतेही उल्लंघन केले तर त्यांच्याशी कोणताही व्यवहार करू नये.

वर्तमानपत्रांना चिमटा
‘स्क्वेअर सेंटीमीटरच्या दरात पैसे घेऊन आमची भाषणे छापतात आणि अग्रलेखातून आम्हालाच उपदेश देत बसतात,’ अशा शब्दांत गडकरी यांनी वर्तमानपत्रांवर टीका केली. मात्र, ‘हे मी महाराष्ट्रातील वृत्तपत्रांबद्दल बोलत नाही. अन्यथा ब्रेकिंग न्यूज व्हायची,’ असे सांगण्यासही ते विसरले नाहीत. विद्या व्यास पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.