आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • University Sarjkata Mandal Will Establish In Pune With The Help Of Four University

पुण्‍यात होणार विद्यापीठीय सर्जकता मंडळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- आरोग्य विज्ञान विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या चारही विद्यापीठांच्या पुढाकाराने आंतर विद्यापीठीय सर्जकता मंडळ पुण्यात स्थापन केले जाणार असून तसा प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोगाकडे मंजुरीसाठी पाठविला असल्याची माहिती आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु प्रा अरुण जामकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हे मंडळ येत्या दोन वर्षात अस्तित्वात येईल आणि त्यासाठी १०० कोटी रुपये बीज भांडवल चारही विद्यापीठे देतील असे नमूद करून ते म्हणाले की, समाजाच्या सर्व क्षेत्रांतील गरीब वर्गाला नव्या कल्पनांचा फायदा मिळावा या हेतूने हे मंडळ स्थापन केले जाणार आहे. यावेळी पर्सिस्टंट सिस्टिमचे व्यवस्थापकीय संचालक आनंद देशपांडे आणि उद्योजक प्रतापराव पवार उपस्थित होते. समाजाच्या तळागाळात असलेल्या लोकांना नवकल्पना मांडण्याची संधी मिळावी यासाठी पर्सिस्टंट, मराठा चेंबर आणि वरील चारही विद्यापीठांच्या पुढाकाराने सर्जकता परिषद येत्या १० -११ डिसेंबरला होणार आहे. त्यासाठी आरोग्य,अभियांत्रिकी, पर्यावरण कृषी अशा सर्व क्षेत्रांचा समावेश केला आहे, अशी माहिती देऊन आनंद देशपांडे म्हणाले की १ ऑगस्ट पर्यंत त्या स्वीकारल्या जातील. त्यातील चार सर्वोत्तम कल्पनांना पारितोषिके दिली जाणार आहेत. उद्योग आणि विद्यापीठे याना एकत्र आणणे हा यामागचा उद्देश आहे.