आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करून खून करणाऱ्या आरोपीला फाशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करून त्याचा खून करणारा अाराेपी खलकसिंह जनकसिंह पांचाळ (रा. खेड, पुणे, मु. रा. उत्तर प्रदेश) याला सत्र न्यायाधीश एस. आर. जगताप यांनी गुरुवारी फाशीची शिक्षा सुनावली. राेहित ऊर्फ साेनू गाेरख डुकरे (८) या मुलाचा त्याने खून केला हाेता. याप्रकरणी राेहितचे वडील गाेरख सुरेश डुकरे (सध्या रा. कडाचीवाडी, ता. खेड, मुळ. रा. नेवासा जिल्हा अहमदनगर) यांनी पाेलिसांत फ‍िर्याद दिली हाेती.

गाेरख डुकरे हे गवंडीकाम करतात. तीन वर्षांपूर्वी ते चाकण परिसरातील कडाचीवाडी येथे कुटुंबासह राहण्यासाठी आले. त्यांच्या शेजारीच पांचाळ राहत होता. मे २०१३ मध्ये त्याने रोहितला खाऊचे आमिष दाखवून निर्जनस्थळी नेले. त्यानंतर अनैसर्गिक कृत्य करून त्याने रोहितचा शस्त्राने खून केला. घटनेनच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांनी त्याला पुणे रेल्वे स्थानकावर अटक केली. दरम्यान, न्यायाधीशांनी पांचाळाला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली.

बालिकेवरही अत्याचार करून खून
रोहितच्या हत्या प्रकरणात पांचाळला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने यापूर्वीही खून केल्याची कबुली दिली. २०११ मध्ये नऱ्हे येथील एका आठ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिचा पांचाळने खून केला होता. रोहितच्या प्रकरणासोबत पोलिसांनी या प्रकरणातही त्याच्याविरोधात दोषारोपत्र दाखल केले. दोन्ही प्रकरणांत न्यायालयाने त्याला दोषी ठरवले.
बातम्या आणखी आहेत...