आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Upcoming Marathi Film 'China Mobile' Launched Poster

मुलांची पौगंडावस्था व मराठवाड्यातील जीवनवास्तव 'चायना मोबाईल' द्वारे पडद्यावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आगामी 'चायना मोबाईल'चे पोस्टर सोमवारी रिलिज करण्यात आले. - Divya Marathi
आगामी 'चायना मोबाईल'चे पोस्टर सोमवारी रिलिज करण्यात आले.
पुणे- वयात आलेल्या मुला-मुलींची पौगंडावस्थेतील जीवनविश्वाचे दर्शन घडवून आणण्याबरोबर मराठवाड्यातील सद्य जीवनस्थिती यावर प्रकाशझोत टाकणारा 'चायना मोबाईल' हा वास्तवावादी चित्रपट बनविण्याची घोषणा चित्रपटांचे निर्माते आणि युवा दिग्दर्शक संतोष राम यांनी सोमवारी पुण्यात केली. येत्या काही दिवसातच याचे शुटिंग लातूर परिसरात सुरु करणार असल्याचे राम यांनी सांगितले.
"चायना मोबाईल" या चित्रपटाद्वारे पौगंडावस्थेतील मुलांच्या जीवनविश्वाचे दर्शन, तसेच आजच्या मराठवाड्यातील जीवनवास्तव पडद्यावर आणण्याचा प्रयत्न आहे. चित्रपटाची पटकथा ही प्रेम, राजकारण आणि मैत्री या मानवी भाव- भावनांभोवती विणलेली आहे, तरी हा चित्रपट जागतिक जीवनमूल्यांचा आत्मा असलेला विषय असेल असे राम यांनी सांगितले.
संतोष रामचा फिचर फिल्म प्रकारातील "चायना मोबाईल" हा पहिलाच चित्रपट असून यापूर्वी "वर्तुळ" हा त्यांचा लघुपट राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवांत दाखविण्यात आला. यात त्याला 14 ठिकाणी पुरस्कार मिळाला. "गल्ली" हा लघुपट आता अनेक चित्रपट महोत्सवातून आपल्यासमोर येत आहे. वर्तुळ, गल्ली या प्रमाणेच "चायना मोबाईल" आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत घेऊन जाण्याचा संतोष रामचा मानस आहे. लातूर जिल्ह्यातील विविध गावांमध्ये या चित्रपटाचे शुटींग 20 जानेवारीपासून सुरु करणार असल्याचे रामने सांगितले.

यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि निवडक कलाकारांसह चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. ‘वर्तुळ’आणि‘गल्ली’या राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवांमध्ये गाजलेल्या चित्रपटाचे निर्माते अशी ओळख असलेल्या युवा दिग्दर्शक संतोष राम याने प्रथमच मोठे पाऊल उचलले आहे. "चायना मोबाईल" ची निर्मिती व दिग्दर्शन तोच करणार आहे.
पुढे पाहा व वाचा...