आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

८९ व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार पिंपरीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पुढील वर्षी होणारे ८९ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन पिंपरी येथे होणार आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संमेलन घेण्याचा बारामती साहित्य परिषदेचा प्रयत्न मात्र यशस्वी होऊ शकला नाही.
पी. डी. पाटील अध्यक्ष असलेल्या पिंपरीच्या डी. वाय. पाटील विद्यापीठाला आयोजनाचा मान देण्याच्या निर्णय घेण्यात आला, अशी माहिती साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. माधवी वैद्य यांनी दिली. महामंडळ पदाधिकाऱ्यांची रविवारी पुण्यात बैठक झाली. त्यात संमेलन स्थळ जाहीर करण्यात आले. डॉ. वैद्य म्हणाल्या, राज्यातील ११ व कर्नाटकातील १ अशा १२ संस्थांची निमंत्रणे होती. यात पिंपरीसह श्रीगोंदे, डोंबिवली व उस्मानाबादची महामंडळाने पाहणी केली. प्रशस्त जागा, सोय पाहून पिंपरीची निवड झाली.

तीन वर्षांत दुसऱ्यांदा मान :
सध्या महामंडळाचे अध्यक्षपद पुण्याकडे आहे. त्यामुळे सलग ३ वर्षांतील साहित्य संमेलनांच्या आयोजनाचा मान पुण्यातील संस्था- व्यक्तींना मिळाला आहे. गेल्या वर्षीचे संमेलन सासवडला, तर यंदाचे घुमानला झाले. पुढील वर्षी पुन्हा पुणे जिल्ह्यातच संमेलन होत आहे.