आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘यूपीअाय’ घाेटाळ्यातील अाराेपींची ‘बिटकॉइन्स’मध्ये गुंतवणूक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीअाय) अॅपचा वापर करताना बँक अाॅफ महाराष्ट्रच्या तंत्रज्ञानातील काही त्रुटींचा गैरफायदा घेत या बँकेच्या २३ शाखांमधून सहा काेटी १४ लाख रुपयांची लूट केल्याचे उघडकीस अाले अाहे.
 
या प्रकरणात अटक करण्यात अालेल्या चार अाराेपींनी चाेरीच्या पैशातून एक काेटी एक लाख रुपयांचे बिटकॉइन (व्हर्च्युअल करन्सी) खरेदी केल्याचे  पुण्यातील सायबर गुन्हे शाखेच्या पथकातून उघडकीस अाले अाहे. हे चारही अाराेपी वाशीम व बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी अाहेत.   
 
संदीप अशाेक मुळे  (३०, रा. गाेवर्धन, ता. रिसाेड,  वाशीम), राजेश जनार्दन बुडुखले (४८, रा. निमगाव, ता. नांदूर,  बुलडाणा), जितेंद्र मारुती रिंधे (४२, रा. सेलसूर, ता. चिखली, बुलडाणा) व दीपक सर्जेराव खराट (२६, रा. देऊळगावराजा, जि. बुलडाणा) अशी या अाराेपींची नावे अाहेत. संदीप मुळे याने राजेश बुडुखले याच्या अॅक्सिस बँकेच्या खात्यावरून अपहार रकमेतील तीन काेटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम अापल्या खात्यात वर्ग केली अाहे. धीरज जैन याने दिलेल्या खात्यावर मुळे याने याच पैशातून एकूण २ काेटी ९३ लाख रुपयांचे बिटकॉइन खरेदी केल्याचे पाेलिस तपासात निष्पन्न झाले अाहे.

बिटकाॅइन खरेदीसाठी एकूण चार अायडी वापरण्यात अालेले अाहेत. या माध्यमातून एक काेटी १९ लाख रुपयांची अपहार रक्कम फिरून फिरून त्याने अप्रत्यक्षरीत्या स्वत:च्याच खात्यावर वर्ग केली अाहे. तर अारटीजीएसद्वारे त्याने वेगवेगळ्या खात्यांवर ४१ लाख रुपये पाठवले अाहेत. अपहार रकमेतून अाराेपी मुळे याने ५९.८२४१०५५२ बिटकाॅइन, खराटे याने ०.०४१३९७६२ बिटकाॅइन, बुडुखले याने ६६.६७ बिटकॉइन खरेदी केले अाहेत, तर रिंढे याने २६ खात्यांवरून एक काेटी ७२ लाखांचा अपहार करून काही रक्कम बिटकाॅइनमध्ये गुंतवल्याचे तपासादरम्यान स्पष्ट झाले अाहे.  

बिटकॉइन म्हणजे काय?  
बिटकॉइन ही व्हर्च्युअल करन्सी असून त्याला करेप्टाे करन्सी म्हणूनही संबाेधले जाते. यामध्ये बनावट नावाचा वापर करूनही खाते उघडता येते. या खात्यांमध्ये पैसे बिटकॉइनमध्ये साठवून अार्थिक व्यवहार केला जाताे. यामध्ये व्यवहार करणाऱ्या कंपन्या स्वत:च्या खात्यावर पैसे जमा करून त्याबदल्यात गुंतवणूकदारास बिटकॉइन देतात. अशा प्रकारे गुंतवणूकदाराच्या खात्यात ब्लाॅकचेनद्वारे बिटकॉइन साठवले जातात. जपान, मलेशिया यासारख्या देशात या व्यवहारास मान्यता अाहे. मात्र, मनी लाँडरिंगचे प्रकार या माध्यमातून हाेत असल्याने रशियात याला मान्यता देण्यात अाली नाही. भारतात बिटकॉइनला कायदेशीर दर्जा द्यावा की नाही याबाबत अद्याप केंद्र सरकार विचार करत अाहे.  

अातापर्यंत पावणेचार काेटी जप्त  
सायबर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक सुनील पवार यांनी सांगितले की, अातापर्यंत यूपीअाय गैरव्यवहरात एकूण १६ अाराेपींना अटक करण्यात अाली असून दाेन अाराेपींना अद्याप अटक करणे बाकी अाहे. बँक अाॅफ महाराष्ट्रच्या विविध खात्यांमधून या अाराेपींनी सहा काेटी १४ लाख रुपये काढले असून त्यापैकी तीन काेटी ७७ लाख ५९ हजार रुपये गाेठवण्यात यश अाले अाहे. यामध्ये राेख ५६ लाख, वेगवेगळ्या बँकांतील दाेन काेटी २० लाख ४१ हजार रुपयांचा, तर बिटकॉइनच्या माध्यमातील एक काेटी एक लाख रुपयांचा समावेश अाहे. याशिवाय अाराेपींकडून ३६ माेबाइल व २७ सिमकार्ड जप्त करण्यात अाले अाहेत.
 
बातम्या आणखी आहेत...