आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM SPL: यूपीएससी यशस्वितांकडून ग्रामीण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- केंद्रीय लाेकसेवा अायाेगाच्या (यूपीएससी) परीक्षेत घवघवीत यश मिळवून अायएएस,अायपीएस, अायअारएस अशा वरिष्ठ पदांवर पाेहोचावे, अशी मनाेकामना स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येकच विद्यार्थ्याची असते. मात्र, या परीक्षेसाठी माेठ्या शहरात जाणे, चांगला क्लास लावणे, क्लासची भरमसाट फी भरणे, निवासाची-भाेजनाची व्यवस्था पाहणे, अावश्यक शैक्षणिक साहित्य जमवणे, तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळवणे अादी गाेष्टींची पूर्तता करताना ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालकांची तारंाबळ उडत असते. ग्रामीण भागातील महाविद्यालयातच यशस्वितेचा कानमंत्र पाेहोचवण्यासाठी या वर्षी निवड झालेल्या यूपीएससी यशस्वितांकडून पुढाकार घेण्यात अाला अाहे.  

शासकीय सेवेत असलेले अधिकारी उज्ज्वलकुमार चव्हाण, अभय फाळके, जीवन बच्छाव, क्रांती खाेब्रागडे, सतीश शिताेळे, स्वप्निल पाटील यांनी पुढाकार घेत ‘यूपीएससीची वारी’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली अाहे. या माध्यमातून अव्यावसायिक, अराजकीय, विनामाेबदला पद्धतीने यूपीएससीत प्रत्येक वर्षी यशस्वी झालेले विद्यार्थी त्यांच्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या महाविद्यालयात जाऊन यूपीएससी परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन करतील. यात परीक्षेची तयारी कशी करावी, काेणती पुस्तके वाचावीत, अभ्यासाचे नियाेजन कसे असावे, लिखाणाची शैली कशी असावी, वैकल्पिक विषयांची निवड, मुलाखतीची तयारी कशी करावी, करिअर मार्गदर्शन अादींबाबत मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले जाईल.

गैरसमज दूर करण्याचे प्रयत्न
मेकॅनिकल इंजिनिअर व यूपीएससी परीक्षेत यशस्वी झालेला अाैरंगाबाद येथील नितीन बगाते  म्हणाला, “यूपीएससीची वारी’ हा अभिनव प्रयाेग असून पहिल्याच दिवशी मी अाैरंगाबादमधील देवगिरी इंजिनिअरिंग महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन  केले. यूपीएससीच्या परीक्षेबाबत अनेक गैरसमज विद्यार्थ्यांच्या मनात असून क्लास न लावताही स्वयंअध्ययन कसे करावे याबाबत विद्यार्थ्यांकडून वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जातात. यूपीएससी परीक्षा यशस्वी केल्यानंतरही चांगले नागरिक कशा प्रकारे व्हावे हे महत्त्वपूर्ण असून त्या दृष्टीने काही प्रमाणात हातभार लावण्याचे काम या माध्यमातून अाम्ही करत अाहाेत.  एमबीबीएसची पदवी प्राप्त केलेला जळगाव येथील उमेदवार साैरभ साेनवणे म्हणाला, ‘यूपीएससी परीक्षेबाबतची नेमकी परिस्थिती व त्यासाठी अभ्यासाचे कष्ट घेण्याची तयारी अनेकांना माहिती नसते. त्याबाबतची जाणीव विद्यार्थ्यांना या माध्यमातून करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत अाहे.’

पहिल्याच टप्प्यात औरंगाबाद, नाशिक, जळगावात   
"यूपीएससी वारी’चे दैनंदिन नियाेजन करण्यात अाले असून १७ ते २३ जुलैदरम्यान पहिला सप्ताह अायाेजित करण्यात अाला अाहे. यामध्ये पहिल्याच दिवशी अाैरंगाबाद, नागपूर, जळगाव, नाशिक, पंढरपूर, इस्लामपूर या ठिकाणच्या महाविद्यालयांत कार्यक्रम घेण्यात अाले. यंदाच्या वर्षी यूपीएससी परीक्षेत यशस्वी झालेले नितीन बगाते, अनिल भगुरे, महेश चाैधरी, साैरभ साेनवणे, रविराज कलशेट्टी, नांदेश्वर दशदिकपाल, अादित्य रत्नपारखी, याेगेश भारास्त,एेश्वर्य डाेंगरे, सुरुची चाैधरी, जयपाल देठे, सचिन माेटे यांनी या कामी पुढाकार घेतला अाहे.