आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिकनवरून आता भारत-अमेरिकेत संघर्षाचा तडका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- अमेरिकी कोंबडीचे मांस आयात करण्यास भारताने परवानगी नाकारल्याबद्दलची अमेरिकी सरकारची तक्रार जागतिक व्यापार संघटनेने (डब्ल्यूटीओ) दाखल करून घेतली आहे. भारताने घातलेल्या या बंदीला अमेरिकेने आव्हान दिले आहे.

‘डब्ल्यूटीओ’च्या लवादाकडे 24 व 25 जुलैला उभय देश यावर भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यानंतर वर्षअखेर प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे. त्यानंतर लवादाचा अहवाल ‘डब्ल्यूटीओ’ला सुपूर्द होणार असून, त्यानंतर अंतिम निकाल येणार आहे. या प्रक्रियेत किमान वर्षाचा कालावधी जाणार असल्याने तोपर्यंत तरी अमेरिकेतील पोल्ट्री उत्पादने भारतात येणार नाहीत, हे स्पष्ट आहे.

अमेरिकेची नफेखोरी : अमेरिकेत चिकन लेगपीस खाणे कमी प्रतीचे समजले जाते. त्यामुळे स्वस्त असते आणि त्याची निर्यातही मोठ्या प्रमाणात होते. याउलट भारतीयांना लेगपीस अधिक आवडते. या ठिकाणी चांगली किंमत मिळते. भारतीय बाजारात नफा कमावण्याची संधी दिसत असल्याने न खपणारे लेगपीस निर्यात करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे.


भारताची बाजारपेठ मोठी
चिकनचा भारताताली दरडोई वार्षिक खप 2.5 ते 3 किलो आहे. अमेरिकेत हाच खप 30 किलो आहे. मध्यमवर्ग व नवश्रीमंतांच्या वाढत्या संख्येमुळे भारतातील मांसाहाराचे प्रमाण वाढते आहे. यामुळे भारतात पोल्ट्री उत्पादनांची मागणी विस्तारणार आहे. मोठी बाजारपेठ पाहूनच भारतात पोल्ट्री उत्पादने विकण्यासाठी अमेरिकेचे प्रयत्न सुरू आहेत.
- डॉ. दिनेश भोसले, अध्यक्ष, क्लेफ्मा ऑफ इंडिया (पशुधन उद्योग क्षेत्रातली राष्ट्रीय संघटना)

भारताचा विरोध का?
1. कोंबडीचा मुख्य भाग अमेरिकेत चढ्या दराने विकायचा आणि लेगपीस स्वस्तात निर्यात करायचे यामुळे भारतीय चिकनच्या किमती घटण्याची शक्यता. म्हणून भारतीय पोल्ट्री उद्योगांचा विरोध.
2. जिवंत कोंबडी न येता तिचे काही भाग आयात होतील. विक्री व वाहतुकीसाठी कोल्ड चेनची गरज आहे. सुविधा अपुर्‍या असल्याने अस्वच्छता व रोगराई पसरण्याची भीती.
(आयातीमुळे स्वस्त मांसाहार मिळेल, असे काहींचे मत आहे.)