आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vaidehi From Pune Won Google's Doodal Competition

पुणेकर वैदेही ठरली गुगलची मानकरी, बालदिनानििमत्त आज डूडल झळकणार वेबसाइटवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - गुगलकडून मिळालेल्या प्रमाणपत्रासह पुण्याच्या आर्मी पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी वैदेही रेड्डी.

पुणे - राष्ट्रीय बालदिनाच्या दिवशी गुगलवर पुणेकर विद्यार्थिनी वैदेहीचे डुडल झळकणार आहे. ‘मला भेट द्यावासा वाटणारा देशातील प्रदेश’ या संकल्पनेवर वैदेही रेड्डीने केलेले डुडल राष्ट्रीय विजेतेपद मिळवणारे ठरले आहे. सलग दुस-या वर्षी गुगल डुडल स्पर्धेत पुण्याने बाजी मारली आहे.
डुडल फॉर गुगल ही स्पर्धा गुगल इंडियाच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर घेतली जाते. देशभरातून यंदा दहा लाख विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. ही स्पर्धा पहिली ते दहावी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी तीन गटांत घेतली जाते. पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी आणि सातवी ते दहावी, असे गट असतात. प्रत्येक गटातील पहिल्या क्रमांकाच्या डुडललाही गौरवण्यात येते. मात्र, गुगलच्या होमपेजवर झळकण्याचा मान राष्ट्रीय विजेत्यालाच मिळतो. हा मान यंदा पुण्याच्या
वैदेहीने पटकावला आहे.

पुण्यात आर्मी पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता नववीमध्ये शिकणारी वैदेही म्हणाली, ‘मी नुकतीच आसामला गेले होते. सुटीच्या काळात आसाममध्ये फिरताना मला हा प्रदेश खूप आवडला. चित्रकलेची आवड लहानपणापासून आहे आणि तिसरीपासून चित्रे काढते. तिथल्या अभयारण्यात एकशिंगी गेंडा पाहिला. तिथली बांबूची घरे, बांबूच्या विविध वस्तू खूप आवडल्या. तेथे सांस्कृतिक कार्यक्रमात आसामी नृत्यही पाहिले. ते मनात रेंगाळत राहिले होते. त्यामुळे स्पर्धेसाठी आसामचेच डुडल तयार करण्याचे ठरवले. माझे डुडल निवडले गेल्याने आता देशभरात मी सहज पोहोचणार आहे.’
अशी झाली स्पर्धा
गुगल इंडियाच्या वतीने आयोजन
इयत्ता पहिली ते दहावीचा गट
देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद
तीन गटात स्पर्धा
प्रत्येक गटातील विजेत्याला पुरस्कार
अंतिम फेरीत १२ स्पर्धक
मतदानाच्या आधारे निवड