आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘व्हॅलेंटाइन’ची गुलाबी सुरुवात,आज रोझ डे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - जगातील सर्वांत तरुण देशात शुक्रवारपासून आठवडाभर गुलाबी रंगाची उधळण होईल. उमलत्या वयातील कोवळ्या, तरल भावना गडद लाल रंगाच्या पाकळ्यांतून आणि सुगंधातून पोहोचवण्याचा प्रयत्न तरुणाई करेल आणि अंदाजे 75 लाख गुलाब पुष्पांची देवघेव होईल. त्यातही राज्यात मावळ भागातील गुलाबांना हॉलंड-नेदरलँडसह देशभरात मागणी आहे. व्हॅलेंटाइन वीकच्या निमित्ताने फक्त गुलाबपुष्पांची तब्बल सहा कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे.
व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारीला असला तरी जगभर सात ते 14 फेब्रुवारी हा काळ व्हॅलेंटाईन वीक म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक दिवसाचे एक वैशिष्ट्य अधोरेखित करत प्रेमसंदेशांची देवाणघेवाण गुलाबपुष्पांच्या साक्षीने केली जाते. त्यामुळे या काळात लाल गुलाबांना सर्वाधिक मागणी असते आणि त्याला सर्वाधिक भावही मिळतो.