आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Valuation Process In Pune University Exam Papers Delayed

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे विद्यापीठातील उत्तरप्रत्रिकांच्‍या मूल्यमापनाचे काम अद्याप प्रलंबितच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- विद्यापीठातर्फे मार्च-एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनाचे काम अद्याप प्रलंबितच असल्याने या कामाला गती देण्यासाठी विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने पुढाकार घेतला आहे. उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनासाठी काही प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यातील ज्या प्राध्यापकांनी अद्यापही विद्यापीठात हजेरी लावली नाही, त्यांना विद्यापीठात हजर होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सोबतच त्यांची नावेही परीक्षा विभागाने विद्यापीठातील सर्व प्राचार्यांकडून मागवली आहेत. विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षाही पार पडल्या होत्या. याच कालावधीत प्राध्यापकांच्या एम. फुक्टो या संघटनेने विविध मागण्यांसाठी आंदोलनही छेडले होते. या आंदोलनात नाशिक जिल्ह्यातील सुमारे हजार प्राध्यापक सहभागी झाले होते. यानंतर विद्यापीठात उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनाला सुरुवात झाली असली तरीही उत्तरपत्रिकांच्या तपासणीसाठी परीक्षा विभागाच्या पूर्वनियोजनानुसार असणारी प्राध्यापकांची संख्या अद्याप उपलब्ध न झाल्याने विद्यापीठाने अनुपस्थित प्राध्यापकांना इशारा देणारे हे फर्मान काढले आहे.
सन 2012-13 चे शैक्षणिक सत्र हे वेळेत सुरू व्हावे, यासाठी विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकांनी तसे आदेश दिले आहेत. त्यामुळे विद्यापीठाकडे आता सर्वांचे लक्ष आहे.