आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: १४७० वारकऱ्यांनी केला नेत्रदानाचा संकल्प

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पुण्यातून पालख्यांचे प्रस्थान होण्यापूर्वी शेकडो वारकऱ्यांनी नेत्रदानाचे फॉर्म भरून एक अनोखा आदर्श घालून दिला अाहे. पुण्यातील शंकरराव भोई प्रतिष्ठानच्या वतीने आणि खडक पोलिस स्टेशनच्या सहकार्याने वारीदरम्यान नेत्रदान प्रसार मोहीम राबविली जात अाहे. त्याला प्रतिसाद देत तब्बल ७९२ वारकऱ्यांनी रितसर फॉर्म भरून नेत्रदानाचा संकल्प केला. याप्रसंगी डॉ. मिलिंद भोई यांनी ‘नेत्रदान–समज व गैरसमज’ या विषयावर वारकऱ्यांचे प्रबोधन केले. यानिमित्त आयोजित शिबिरात १४७० वारकऱ्यांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले.
त्यांना नी कॅप आणि औषधांचे वाटप करण्यात आले. वारकरी स्त्रियांनीही नेत्रदान संकल्पाला उत्तम प्रतिसाद दिला.