आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vasundhara Award Decler To Mishra,khandal,rehamani

मिश्रा, खंडाल, रेहमानी यांना वसुंधरा पुरस्‍कार जाहीर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील वसुंधरा पुरस्कारांची घोषणा मंगळवारी महोत्सवाच्या निमंत्रक आरती किर्लोस्कर यांनी पत्रकार परिषदेत केली. ज्येष्ठ जलव्यवस्थापन तज्ज्ञ अनुपम मिश्र यांना वसुंधरा सन्मान जाहीर झाला असून धर्मेंद्र खंडाल (वसुंधरा मित्र - कार्यकर्ता), संदेश कडूर (वसुंधरा मित्र - फिल्ममेकर), बाएफ संस्था (वसुंधरा मित्र संस्था), रमेश गावस (वसुंधरा ग्रीन टीचर) आणि डॉ. असद रेहमानी (वसुंधरा जीवनगौरव) हे अन्य पुरस्कारांचे मानकरी आहेत.

धर्मेंद्र खंडाल हे राजस्थानमधील पर्यावरणतज्ज्ञ तर संदेश कडूर हे उत्तम वन्यजीव छायाचित्रकार आणिफिल्ममेकर आहेत.यावर्षीचा वसुंधरा महोत्सव 25 जानेवारी ते दोन फेब्रुवारीदरम्यान पुण्यात आयोजित करण्यात येणार आहे. जलसंवर्धन - भविष्यरक्षण ही यावर्षीच्या महोत्सवाची संकल्पना आहे.