आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वसुंधरा महोत्सवाचा प्रारंभ सोलापूरपासून होणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पर्यावरण जतन, संवर्धनाचा उद्देश घेऊन सुरू करण्यात आलेल्या किलरेस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा प्रारंभ या वर्षी सोलापूरपासून होणार आहे. 12 ते 15 जुलैदरम्यान सोलापूरमध्ये पर्यावरणविषयक चित्रपटांसह विविध तज्ज्ञांची व्याख्याने, चर्चा, प्रदर्शने, ग्रीन कॉन्फरन्स, कार्यशाळा आणि नेचर ट्रेल्स असे उपक्रमही या महोत्सवादरम्यान होणार आहेत.
या महोत्सवाच्या निमंत्रक आरती किर्लोस्कर, विजय वर्मा, संयोजक वीरेंद्र चित्राव, तन्वी थत्ते (पगमार्क संस्था) यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. वसुंधरा चित्रपट महोत्सवात या वर्षी 15 देशांतील 40 चित्रपट दाखवले जाणार आहेत.
भारतासह बांग्लादेश, नेपाळ, र्शीलंका, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, ब्रिटन, मालदीव, दक्षिण अफ्रिका, केनिया, जपान, टांझानिया, मंगोलिया आदी देशांतील पुरस्कारप्राप्त चित्रपट व लघुपटांचा महोत्सवात समावेश आहे. तसेच पर्यावरण रक्षणाच्या कार्यात महत्त्वाचे योगदान देणार्‍या व्यक्ती व संस्थांना वसुंधरा सन्मान व वसुंधरा मित्र पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती चित्राव आणि किर्लोस्कर यांनी यावेळी दिली.