आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारीतील वाहनांची तांत्रिक तपासणी होणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - आषाढी वारीतील सहभागी वाहनांची तांत्रिक पूर्वतपासणी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने करण्यात येणार आहे. वाहनांच्या तपासणीसाठी 9 ते 19 जून असा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. आरटीओच्या आळंदी रोड येथील कार्यालयात ही तपासणी करण्यात येईल, असे आरटीओच्या वतीने येथे स्पष्ट करण्यात आले आहे. यंदाचा पालखी सोहळा 19 जूनपासून सुरू होणार आहे. देहू-आळंदी-पंढरपूर या मार्गाने वारीचे प्रस्थान सुरू असताना पालखी मार्गावर अनेक जड वाहने सामील होतात. या वाहनांतील तांत्रिक दोषांमुळे अपघात होऊ नयेत, वाहने बंद पडून वाहतुकीस अडथळा होऊ नये, यासाठी ही तांत्रिक पूर्वतपासणी आवश्यक असल्याचे मत आरटीओने व्यक्त केले आहे. पालखी सोहळ्यात सहभागी होणार्‍या सर्व वाहनधारक व चालकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.