आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाहन चोरून लूटमार करणा-या चौघांना अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - वेगवेगळ्या शहरातून चारचाकी व दुचाकी चोरून नेऊन लूटमार करणा-या चौघांच्या टोळीला पुणे पोलिसांनी शुकवारी अटक केली. विशाल िदलीप माेरे (रा.शिक्रापूर, पुणे), अरुण हरी राठाेड (रा.सदर), अक्षय गजानन भुजबळ (रा.तळेगाव ढमढरे, पुणे), हरिप्रसाद नवनाथ पुंडे (रा.शिक्रापूर, पुणे) व अभिजित बापुसाे भुजबळ (रा.तळेगाव ढमढरे, पुणे) अशी अटक करण्यात अालेल्या अाराेपींची नावे अाहेत.

अाराेपींनी अाैरंगाबाद, बीड, अहमदनगर, नाशिक, पुणे व इतर शहरांतून वाहने चोरून नेत त्यांना चाकूचा धाक दाखवून लूटमारी केली आहे. या वेळी त्यांच्या ताब्यातून एक चारचाकी हुंडाई अाय १० कार, तीन दुचाकी वाहने, ३२ माेबाइल फाेन, ७० सिमकार्ड, एक लॅपटाॅप, पाच चाकू, पाेलिसांचे अायकार्ड, लुटण्यात आलेल्या नागरिकांची ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, लुटीचा उद्देश साध्य झाल्यानंतर त्यांनी अनेक वाहने रस्त्यावरच सोडून पलायन केले.

लिफ्टच्या बहाण्याने लूट
अाराेपी हे वेगवेगळ्या शहरात लिफ्टच्या बहाण्याने गाडी अडवत हाेते. त्यानंतर गाडीत बसल्यानंतर वाहन चालकास चाकूचा धाक दाखवून त्यांना लुटत असे. अाराेपींविराेधात अाैरंगाबाद, अहमदनगर, पाथर्डी, बीड, सासवड, शिक्रापूर, पुणे याठिकाणी गुन्हे दाखल अाहेत. ज्या नागरिकांची अशाप्रकारे लुटमारी झाली त्यांनी गुन्हे शाखा प्राॅपर्टी सेल यांच्याशी या क्रमांकावर ०२०-२६११२२२२ संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.