आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत वाहन चोरी करणारे जेरबंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - औरंगाबाद, पुणे शहरात वाहनांची चोरी करणार्‍या एका टोळीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीतील सात आरोपींकडून नऊ गुन्ह्यातील तीन चारचाकी व सहा दुचाकी वाहने जप्त केली आहेत.

राहुल हनुमंत अंधारे, भालचंद्र नारायण पुरी, परमेश्वर अशोक अभंगे (रा. लातूर), फिरोज युसूफ मकानदार, समाधान गोविंद कदम, नीलेश दिलीप जाधव (रा. कोल्हापूर) व गणेश पुरी अशी आरोपींची नावे आहेत. पोलिस कर्मचारी सचिन उगले यांनी 26 जून रोजी गस्तीवर असताना कार चालकाकडे कागदपत्रांची पाहणी केली असता, एक कार चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. या वेळी एका आरोपीला संशयावरून अटक करण्यात आली. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर इतरांनाही अटक करण्यात आली. आरोपींनी चंदननगर, येरवडा, औरंगाबादेतून वाहने चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून तीन कार जप्त करण्यात आल्या.