आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Venkaiah Naidu Commented On The Tolerance And Intolerance

पंतप्रधानांना नाकारणे ही असहिष्णुताच : नायडू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘अभिनेता अामिर खान हा माझा चांगला मित्र अाहे. मात्र, मध्यंतरी त्याने चुकीच्या पद्धतीने वक्तव्य केल्याने मी व सारा देश दुखावला. बहुमताने निवडून अालेले पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना न स्वीकारणे हीसुद्धा एक प्रकारची अहिष्णुताच अाहे. त्यामुळे प्रत्येकाने दुसऱ्याच्या विचारांचा अादर करायला हवा,’ असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी केले.
माइर्स एमअायटी अायाेजित सहाव्या भारतीय छात्र संसदेत ते बाेलत हाेते. प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन, खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री राजेश टाेपे, अासाम कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. के. एम. बुजरबरुहा, डाॅ. विश्वनाथ कराड, राहुल कराड उपस्थित हाेते. नायडू म्हणाले, ‘निसर्गचक्रामुळे शेतीसमाेरील समस्या वाढत अाहेत. त्यामुळे अाज काेणत्याही शेतकऱ्याला अापला मुलगा शेतकरी व्हायला नकाेय. शेतीवर शासनाने अातापर्यंत अनेक वेळा बंधने घातल्याने शेतकरी मागे राहिला अाहे. ही बंधने दूर करून पूर्ण देश एक फूड झाेन बनवण्यासाठी पंतप्रधान गांभीर्याने उपाययाेजना करत अाहेत. अायटी क्षेत्र शेतीशी जाेडले पाहिजे तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतीच्या बांधापर्यंत पाेहोचवले तरच शेतकरी अात्महत्येचे िचत्र बदलता येर्इल. देशभरातील केवळ ४२ टक्के शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज िमळते. त्यामुळे इतरांना सावकारांकडून कर्ज घेण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र, अाता बँकांना ग्रामीण भागापर्यंत पाेहोचून शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यास सांगण्यात अाले अाहे. पीक विमा याेजना, शेतीमालास भाव िमळणे, गाेदाम, शीतगृहे, फूड पार्क यांची उभारणी करणे. यातून शेती क्षेत्रास चालना देण्याचा प्रयत्न केला जात अाहे. यातून सकारात्मक गाेष्टी नक्कीच घडतील.’

परिवर्तन न झाल्याचा खेद
खासदार शेट्टी म्हणाले, ‘मागील १५ वर्षांत सर्वपक्षीय सरकार अाले तरी तीन लाख शेतकऱ्यांनी अात्महत्या केल्या. मी सत्तापरिवर्तनात सहभाग घेतला, पण व्यवस्था परिवर्तन झाले नाही ही सल मला बाेचत अाहे. ‘अच्छे दिन’ हे स्वप्न अापण लाेकांना दाखवून सत्तेत अालाे, पण हे अजूनही चित्र धूसरच अाहे. याबाबत लक्ष द्यायला हवे.’

भारतीय संसद ‘फाेर डी’
डिबेट, डिस्कस, डिसाइड अशी ‘थ्रीडी’ संसद अपेक्षित असताना गाेंधळामुळे (डिस्पाेज) ती ‘फाेर डी’ झाली अाहे, अशी खंत नायडूंनी व्यक्त केली.