आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनियाजी आहेत तोवरच काँग्रेस; वेंकय्या नायडू यांची भविष्यवाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- 'देशभरातून काँग्रेसचे अस्तित्व संपत चालले आहे. काँग्रेस म्हणजे "बुडते जहाज' असल्याचे लक्षात अाल्याने प्रांतोप्रांतीचे काँग्रेस नेते-कार्यकर्ते काँग्रेसचा त्याग करू लागले आहेत. सोनियाजी आहेत तोवरच काँग्रेस टिकून राहील,' असे मत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी व्यक्त केले.

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीचे उद्घाटन नायडू यांच्या हस्ते शनिवारी पुण्यात झाले. त्यानंतर ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे अध्यक्षस्थानी होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे सर्व आमदार, खासदार, पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. नायडू म्हणाले, "भौगोलिकदृष्ट्या देशातील ४६ टक्के भूभागावर आज भाजपची सत्ता आहे. देशातली ३० टक्के लोकसंख्या भाजपशासित राज्यांमध्ये आहे. काँग्रेसची सत्ता केवळ टक्के भूभागावर उरली आहे. देशातल्या एकाही मोठ्या राज्यात काँग्रेस सत्तेवर नाही. कर्नाटकातूनही येत्या निवडणुकीत काँग्रेस हद्दपार होणार आहे.' पन्नास वर्षांहून अधिक काळ काँग्रेसने "पार्लमेंट ते पंचायत' अशी सत्ता देशभर गाजवली. त्यामुळेच दोन वर्षांपूर्वी जनतेने दिलेला सत्तांतराचा आदेश त्यांना अजून पचवता आलेला नाही. या वैफल्यातूनच ते नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस सरकारविरोधात आरोपांचा अपप्रचार करत आहेत. मात्र, दीर्घकाळ सत्ता भोगलेल्या काँग्रेसकडे आरोप करण्याची नैतिकता शिल्लक आहे का, असा प्रश्न नायडू यांनी या वेळी बोलताना केला.
"काँग्रेसने साठ वर्षे "गरिबी हटाव'च्या नुसत्या पोकळ घोषणा दिल्या; पण आजही या देशातली २५ टक्के जनता दारिद्र्य रेषेखाली आहे. गरिबांसाठी घोषणा आणि श्रीमंतांचे पोषण हेच काँग्रेसचे धोरण राहिले. नरेंद्र मोदी सरकारने गरीब, आदिवासी, अल्पसंख्याक, मागासवर्गीय यांच्या विकासाला प्राधान्य दिले आहे.

नेहरूं एवढेच सावरकर महान
पंडित नेहरू थोर होतेच; पण म्हणून लोकमान्य टिळक, सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस, वीर सावरकर आदींची थोरवी कमी होत नाही. हे नेतेदेखील नेहरूंइतकेच महान होते. मोदी सरकार असहिष्णू असल्याचा आरोप करत पुरस्कारवापसी सुरू झाली. साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणारे बाराशे साहित्यिक आज हयात आहेत. यातल्या ३७ जणांनी पुरस्कार परत केले. त्यामुळे असहिष्णुतेचा आरोप बिनबुडाचा असल्याचे स्पष्ट होते.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...