आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज निकाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - तीन वर्षांपूर्वी पुण्यातील उच्चभ्रू वसाहतीत जर्मन बेकरी येथे झालेल्या दहशतवादी बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल अतिरिक्त सत्र विशेष न्यायाधीश एन. पी. धोटे यांच्या न्यायालयात सोमवारी जाहीर केला जाणार आहे. या खटल्यातील दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) ताब्यात असलेला एकमेव आरोपी मिर्झा हिमायत बेग (31, रा. उदगीर) याला न्यायालयात काय शिक्षा सुनावली जाते याबाबत उत्सुकता आहे.

कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरीत 13 फेब्रुवारी 2010 रोजी सायंकाळी सातच्या सुमारास दहशतवाद्यांनी बॉबस्फोट घडवला होता. यात 17 जणांचा मृत्यू झाला होता तर 56 जण जखमी झाले होते. या परिसरात विदेशी नागरिकांचा अधिक वावर असल्याचे ध्यानात ठेवूनच जर्मन बेकरीला लक्ष्य करण्यात आले होते, हे तपासाअंती स्पष्ट झाले होते. एटीएसने स्फोटाचे तपासकार्य युद्धपातळीवर राबवून न्यायालयीन प्रक्रियेला गती दिली. त्यामुळे सव्वातीन वर्षांपेक्षाही कमी कालावधीत स्फोटाचा निकाल लागत आहे.