आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉसमॉस सहकारी बँकेचे उपाध्यक्ष मधुकर अत्रे यांचे निधन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- दि कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष आणि माजी अध्यक्ष मधुकर वामन अत्रे (७७) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी (१८ जुलै) निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 

या वेळी कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे, समूह अध्यक्ष डाॅ. मुकुंद अभ्यंकर, ज्येष्ठ संचालक कृष्णकुमार गोयल, संचालक मंडळ सदस्य आणि व्यवस्थापकीय संचालक सुहास गोखले यांनी अत्रे यांना श्रद्धांजली वाहिली.कॉसमॉस बँकेच्या वतीने शनिवारी (२२ जुलै) रोजी सायंकाळी ५.३० वाजता बँकेच्या विद्यापीठ रस्त्यावरील कॉसमॉस टॉवर या मुख्यालयात शोकसभेचे आयोजन केले असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांनी दिली.  
बातम्या आणखी आहेत...