आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्रोही स्त्री साहित्य संमेलन पुण्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - माहिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर समताधिष्ठित समाज निमिर्तीसाठी पहिले विद्रोही स्त्री साहित्य-संस्कृती संमेलन पुण्यात आयोजित करण्यात आले आहे.

19 व 20 ऑगस्ट रोजी संत गाडगेबाबा धर्मशाळा, रास्ता पेठ येथे हे संमेलन होणार असल्याची माहिती विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी व सचिव सिद्धार्थ जगदेव यांनी दिली. या वेळी कविसंमेलन, शाहिरी जलसा, गटचर्चा, चित्रप्रदर्शन, लघुपट व एकपात्री प्रयोग असे कार्यक्रम राबवले जाणार आहेत. या संमेलनात राज्यातील महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन परदेशी यांनी केले.