आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vijay Shitare Comment On Irrigation Department Corruption Enqury Issue

सिंचन घोटाळ्याची चौकशी धिम्यागतीने, राज्यमंत्री शिवतारेंचा सरकारला घरचा आहेर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती - राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात सिंचन घोटाळ्याचा मुद्दा प्रचारात वापरून सत्ता हस्तगत करणाऱ्या फडणवीस सरकारकडून या घोटाळ्याची चौकशी संथगतीने केली जात आहे. शिवसेनेचे नेते तथा जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनीच मंगळवारी सायंकाळी बारामतीत पत्रकारांशी बोलताना हा गौप्यस्फोट केला. मात्र, सिंचन क्षेत्रात काय नव्याने निर्मिती करता येईल, यावर आपला भर असल्याचे सांगण्यासही ते विसरले नाहीत.

राज्यातील सिंचन घोटाळे किंवा इतर गैरव्यवहारांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. कोणत्याही घोटाळ्याची चौकशी खुनशी प्रवृत्तीने केली जाणार नाही अथवा त्याचे राजकारणही केले जाणार नसल्याचे शिवतारे म्हणाले.

ऊसदराच्या मुद्द्यावरून सहकारमंत्री चंद्रकांत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून मार्गदर्शन घेत आहेत, असा आरोप शेतकरी संघटनांकडून होत आहे. याकडे लक्ष वेधले असता शिवतारे म्हणाले की, आमच्या सरकारला फक्त चारच महिने झाले आहेत. चंद्रकांत पाटील यांची शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका आहे. आमचे सरकार सहकार बुडव्यांच्या हातातून सहकारी चळवळ काढून घेण्याचा प्रयत्न करत आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी लवकरच मोठा निर्णय घेणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.