आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य महिला आयोगाकडे तिहेरी तलाकचे 450 खटले; ‘लिव्ह इन रिलेशनशिप’च्या तक्रारी वाढल्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- राज्य महिला आयोगाकडे तिहेरी तलाकचे सुमारे 450 खटले दाखल असल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी मंगळवारी सांगितले. कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम 2013 या अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या सदस्यांचे प्रशिक्षण आणि जनसुनावणी घेण्यात आली. त्यानंतर पत्रकार परिषदेत रहाटकर यांनी ही माहिती दिली. 
 
रहाटकर म्हणाल्या, सुप्रीम कोर्टाने तिहेरी तलाकबाबत घेतलेला निर्णय ऐतिहासिक आहे. मुस्लिम समाजातील महिलांना या निर्णयामुळे आत्मसन्मानाने जगण्याची उमेद मिळणार आहे. 
 
‘लिव्ह इन रिलेशनशिप’च्या तक्रारी वाढल्या
‘आयोगाकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये आता ‘लिव्ह इन रिलेशनशिप’च्या तक्रारी वाढल्या आहेत. ही चिंतेची बाब आहे. याबाबत खबरदारी घेण्याची वेळ आली असून, लोकजागृती करावी लागणार आहे. याशिवाय सायबर गुन्ह्यांच्याही तक्रारी वाढत आहेत’, असे त्यांनी नमूद केले. पीडित महिला आणि अल्पवयीन मुलींना ‘मनोधैर्य’ योजनेअंतर्गत सुमारे दहा लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. मात्र, बँकेत खाते नसल्याने राज्यात सुमारे साडेतीन हजार पीडित महिला मदतीपासून वंचित आहेत. 
बातम्या आणखी आहेत...