आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्वाल्हेर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका वीणा सहस्त्रबुद्धे यांचे निधन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- ग्वाल्हेर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका वीणा सहस्त्रबुद्धे ( ७७) यांचे बुधवारी रात्री बाराच्या सुमारास दीर्घ आजाराने पुण्यात निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, कन्या, मुलगा आणि नातवंडे असा परिवार आहे.

वीणाताईंचा जन्म १४ डिसेंबर १९४८ रोजी कानपूर येथे झाला. पंडित पलुस्कर परंपरेतील पं. शंकरराव बोडस यांच्या त्या कन्या. संगीताचे मार्गदर्शन त्यांना पं. बोडस, बंधू काशिनाथ, तसेच पं. बलवंतराय भट्ट, पं. वसंत ठकार, पं. गजाननबुवा जोशी यांच्याकडून मिळाले. कथक नृत्यही त्या शिकल्या होत्या. कलाकार तसेच अध्यापन, वाग्गेयकार म्हणूनही त्या लोकप्रिय होत्या. संगीत नाटक अकादमी पुरस्काराने त्यांना गौरवले होते.
बातम्या आणखी आहेत...