आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाच युवा रंगकर्मींना प्रतिष्ठेचे विनोद दोशी पुरस्कार जाहीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘साहित्य रंगभूमी प्रतिष्ठान’च्या वतीने रंगभूमीवरील युवा रंगकर्मींसाठी देण्यात येणारे ‘विनोद दोशी पुरस्कार’ सोमवारी जाहीर करण्यात आले. अमेय वाघ, सागर देशमुख, सागर लोधी, संजुक्ता वाघ आणि केतकी थत्ते हे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. प्रत्येकी एक लाख रुपये असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.

प्रतिष्ठानचे विश्वस्त अशोक कुलकर्णी म्हणाले, ‘पुरस्काराचे हे दहावे वर्ष आहे. कलाक्षेत्रात झोकून देऊन सकारात्मक काम करणार्‍यांना हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराची रक्कम एकदम न देता १२ धनादेशांद्वारे दिली जाते. त्यामुळे कलाकारांना दरमहा आर्थिक हातभार मिळतो. पुरस्कारासाठी कोणतीही अट नसते. कलेप्रति समर्पित वृत्ती आणि सक्रिय सहभाग पाहूनच पुरस्कार दिले जातात,’ असे कुलकर्णी यांनी या वेळी स्पष्ट केले.

ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर म्हणाले,‘ पुरस्कार वितरण समारंभ पुण्यात २१ फेब्रुवारीला होईल. तसेच यानिमित्ताने ख्यातनाम नाटककार, अभिनेते गिरीश कर्नाड यांच्या दोन व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘स्ट्रक्चर ऑफ प्ले’ आणि ‘मॉडर्न इंडियन कल्चर’ अशा दोन विषयांवर कर्नाड विचार मांडतील. २२ फेब्रुवारीला ही व्याख्याने होतील.”