पुणे- अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डाॅ. नरेंद्र दाभाेलकर यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी सीबीअायने सनातन संस्थेचा साधक डाॅ. वीरेंद्रसिंह तावडे याला अटक केली अाहे. याप्रकरणी अाराेप निश्चिती हाेत नसल्याने जामीन मिळण्यासाठी तावडे याने न्यायालयात अर्ज केला हाेता. मात्र, अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश अार.एन.सरदेसार्इ यांनी तावडे याचा जामीन अर्ज गुरुवारी फेटाळून लावला. सीबीअायच्या वकिलांनी डाॅ.दाभाेलकर प्रकरणात तावडे हाच मास्टरमाइंड असल्याचा युक्तिवाद केला. तावडेला जामीन मंजूर झाल्यास ताे साक्षीदारांवर दबाव अाणून पुरावे नष्ट करण्याची शक्यता नाकारता येत नाही. फरार अाराेपी सारंग अकाेलकर व विनय पवार यांना अद्याप अटक करायची अाहे. त्यामुळे तावडे याला जामीन देण्यात येऊ नये, असा युक्तिवाद करण्यात अाला हाेता. दरम्यान, बचाव पक्षाच्या वकिलांनी तावडे विराेधात पुरावे नसल्याने प्रकरणाची सुनावणी सुरू झाली नसल्याचे सांगितले.