आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vishwajeet Kadam & Srirang Barne File Nomination Form For Loksabha

विश्वजित कदमांकडून साधेपणाने अर्ज दाखल, श्रीरंग बारणेंचे जोरदार शक्तीप्रदर्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम यांनी आज कोणताही गाजावाजा न करता अर्ज दाखल केला. यावेळी खासदार वंदना चव्हाण, काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड यांच्यासह मोजकेच पदाधिकारी होते. दुसरीकडे, मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी आपल्या समर्थकांसह जोरदार शक्तीप्रदर्शन करीत अर्ज दाखल केला. भाजपचे पुण्याचे उमेदवार अनिल शिरोळे यांनीही आज अर्ज दाखल केला.
पुणे जिल्ह्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे चारही उमेदवार बुधवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र, त्याआधीच आज सकाळी 11 वाजता विश्वजित कदम यांनी सोबत कोणताही लवाजमा न आणता साधेपणाने अर्ज दाखल केला. दरम्यान, या मागे मुर्हूताचे कारण सांगितले जात आहे. विश्वजित यांच्यासाठी आजच्या सकाळची वेळ शुभ असल्याने त्यांनी अर्ज सादर केला. मात्र, उद्या ते पुन्हा आघाडीच्या उमेदवारासोबत शक्तीप्रदर्शन करतील व अर्ज सादर करतील. त्याआधी आज सकाळी विश्वजित यांनी कॉन्टोमेंट, भैरोबा नाला येथे बिशप हाऊसला भेट दिली व यादरम्यान पदयात्रा काढली.
बारणेंचे जोरदार शक्तीप्रदर्शन, वाचा पुढे...