आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vitthalsahastranam Found In Bhandarkar Institute

अप्रकाशित ठेवा: भांडारकर संस्थेत सापडले ‘विठ्ठलसहस्रनाम’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - श्रीविष्णूंचे स्वरूप वर्णन करणारे ‘विष्णुसहस्रनाम’ आपल्या सर्वांना परिचित आहे. मात्र, अशाच प्रकारे श्रीविठ्ठलाचे स्वरूपवर्णन करणारे ‘विठ्ठलसहस्रनाम’ही आता प्रकाशात आले आहे. या नव्या सहस्रनामाची उपलब्धी भाषाशास्त्र, परंपरा आणि दैवतशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.

मराठी हस्तलिखित केंद्राचे संचालक वा. ल. मंजूळ यांना भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या हस्तलिखित संग्रहात एक छोटेखानी हस्तलिखित सापडले. त्याचा अभ्यास केल्यावर हे हस्तलिखित म्हणजे ‘विठ्ठलसहस्रनाम’ असल्याचे लक्षात आले. हरिदास नामक लेखकाने या विठ्ठलसहस्रनामाची रचना केली आहे, असा उल्लेख आहे. मात्र हा हरिदास नेमका कोण, कुठला याची माहिती अद्याप मिळालेली नाही. पंढरपूरमध्ये शोध घेतला असता या हरिदासाची परंपरा मिळत नसल्याचे श्री. मंजूळ यांनी स्पष्ट केले.

विठ्ठलसहस्रनामाचे वैशिष्ट्य
> हस्तलिखित संस्कृत भाषेत आहे
>एकूण २०० श्लोकांचा समावेश
>भांडारकर संस्थेत हे हस्तलिखित १९२० मध्ये आल्याचा उल्लेख
>लेखनपद्धती, संदर्भ पाहता हे १८८५ च्या सुमारास रचले असावे, असा निष्कर्ष

मुंबई ते पुणे प्रवास
हे हस्तलिखित सापडले कसे, याचा प्रवासही रंजक आहे. ऐन ब्रिटिश काळात खुद्द ब्रिटिशांनीच एतद्देशीय संस्कृतीचा ठेवा असणा-या हस्तलिखितांच्या संकलनासाठी काही विद्वानांची नेमणूक केली होती. त्यापैकीच एका विद्वानाला हे विठ्ठलसहस्रनामाचे बाड मिळाले. ते प्रथम तत्कालीन मुंबई इलाख्यात, नंतर डेक्कन कॉलेजमध्ये आणि तेथून १९२० मध्ये भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरात आल्याचा उल्लेख आहे. भांडारकरची स्थापना १९१७ मध्ये झाली. त्यानंतर तीन वर्षांनी हे बाड संस्थेकडे आले.

श्रीकृष्णवाचक नामांचा समावेश
विठ्ठलसहस्रनाम या हस्तलिखितात विठ्ठलाची एक हजार नामे आढळतात. वैशिष्ट्य म्हणजे ही नामे कृष्णलीलांशी जवळीक साधणारी आहेत. वृंदावन, गोप-गोपी, गोकुळ.. आदींचे उल्लेख व तद्विषयक नामे अधिक प्रमाणात आहेत. द्वारकेश्वर:, मुरलीधर:, गिरीधर:, कमलाबंधुसुखदा, कृष्णावतीक्लेशहर्ता, पद्मावतीप्रियनमोनम:, गोपीजनवल्लभा..अशा प्रकारची असंख्य श्रीकृष्णवाचक नामे यामध्ये आढळतात.
वा. ल. मंजूळ, संचालक, मराठी हस्तलिखित केंद्र