आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Volvo Bus & Truck Catch Fire On Mumbai Pune Expressway; Two Dead

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवर व्हॉल्वो बस- ट्रक अपघातात 2 ठार, दोन्ही वाहने जळून खाक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुणे-मुंबई एक्स्प्रेसवर दुरूस्तीसाठी रस्त्याच्या बाजूला उभे असलेल्या व्हॉल्वो बसला मागून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहने जळून खाक झाली. यात ट्रकचालकासह ट्रकमधील आणखी एक व्यक्ती मृत्यूमुखी पडले. मात्र, बसमधील 35 प्रवासी सुदैवाने खाली उतरल्याने बालबाल बचावले. ही घटना पहाटे तीनच्या सुमारास उर्से टोलनाक्याजवळ घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरू येथील SRA या ट्रॅव्हल्स कंपनीची एक व्हॉल्वो बस मुंबईहून बंगळुरुकडे जात होती. मात्र, रात्री तीनच्या सुमारास उर्से टोलनाक्याच्या पुढे या बसचा AC बेल्ट तुटल्याने तो बंद झाला. उन्हाळ्याचे दिवस असल्याने प्रचंड गरम होऊ लागले. प्रवाशांनी तक्रार केल्यानंतर बस चालकाने तेथे जवळचा दुरस्तीसाठी बस थांबवली होती. गरम होत असल्याने बसमधील सर्व 35 प्रवासी खाली उतरले होते. मात्र, काही वेळातच मागून वेगाने ट्रक आला व ट्रकने थेट बसला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती दोन्ही वाहनांच्या इंजिनांनी लागलीच पेट घेतला. त्यामुळे ट्रकमधील चालकाला व क्लीनरला आपला जीव वाचविण्याची संधी मिळाली नाही. या दोघांची ओळख अद्याप पटली नाही. पोलिस पुढील चौकशी करीत आहेत.