आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Voter Name Gayab From Voter List, Citizen Compalients At EC

पुण्यात मतदार यादीतून अनेकांची नावे गायब, नागरिकांच्या तक्रारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- लोकसभेच्या पाचव्या व राज्यातील दुस-या टप्प्यात पुण्यात आज मतदान होत आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत पुण्यात सुमारे 35 टक्केपेक्षा जास्त मतदान झाले होते. पुणेकरांनी सकाळपासूनच रांग लावून मतदान केले. 11 नंतर मतदानाचा वेग कमी झाला. मात्र त्याचवेळी अनेक मतदारांची नावे मतदार यादीतून गायब असल्याची तक्रारी नागरिकांनी केल्या. यात अनेक दिग्गजांची नावे गायब असल्याचे पुढे आले आहे. संगीतकार, गायक सलील कुलकर्णी, संध्या गोखले, अमोल पालेकर यांची नावे मतदार यादीतून गायब होती. याचबरोबर गेली 30-30 वर्षे त्याच पत्त्यावर राहणा-या अनेक नागरिकांची नावे गायब होती. यामुळे मतदान केंद्रावर मतदानासाठी गेल्यावर अनेकांचा हिरमोड झाला. दरम्यान, पुण्यातील अधिका-यांनी याबाबत पुरवणी यादी मागवून नावे नसलेल्या नागरिकांना मतदानापासून वंचित राहता कामा नये यासाठी पुढाकार घेत मतदानाचा टक्केवारी वाढवण्याचा प्रयत्न केला.
मागील आठवड्यात विदर्भातील अमरावती लोकसभा मतदारसंघातही सुमारे 46 हजार मतदारांची नावे मतदान यादीतून गायब झाली होती. पुरवणी यादीत नावे आढळून आल्यानंतर तेथील मतदारांनी मतदान केले होते.
छायाचित्र- नागरिकांच्या तक्रारी येताच भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे यांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांची भेट घेऊन तक्रार दाखल केली. त्यावेळी चर्चा करताना शिरोळे आणि राव...