आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: मतदार यादीत नाव नोंदण्यासाठी आज शेवटचा दिवस; नागरिकांची धावपळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- पुण्यातील चिंचवड मतदारसंघातील थेरगाव येखील यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळेत मतदार यादीत नाव नोंदणी करताना नागरिक)
पुणे- पुढील महिन्यात होणा-या विधानसभा निवडणुकीसाठी मतदार नोंदणी करण्यासाठी आज (बुधवार) शेवटचा दिवस आहे. आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत नोंदणी करणारे नागरिक विधानसभा निवडणुकीत मतदान करू शकतील. निवडणूक आयोगाच्या वतीने 1 जानेवारी 2014 रोजी ज्यांनी वयाची 18 वर्षे पूर्ण केली आहेत, त्यांना मतदार यादीत नाव नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, केवळ आजचाच दिवस शिल्लक राहिल्याने नागरिकांनी नावनोंदणीसाठी ठिकठिकाणच्या केंद्रांवर गर्दी केल्याचे चित्र आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत लाखो मतदारांची नावे मतदार यादीत आढळून न आल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. मतदानादिवशी नावे नसल्याची माहिती समोर आल्याने मतदान करण्यासाठी आलेल्या नागरिकांचा हिरमोड झाला होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत तरी नागरिक मतदानापासून वंचित राहू नयेत यासाठी आयोगाने कंबर कसली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाने मतदार नोंदणीला सुरुवात केली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पुढे पाहा, छायाचित्राच्या माध्यमातून नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदण्यासाठी ठिकठिकाणच्या केंद्रांवर गर्दी केली आहे...