आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडकीतील बलात्काराची तक्रार खोटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पुण्याजवळील वडकी येथे चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या दोघांनी एका विवाहित दलित महिलेवर बलात्कार केल्याची घटना शनिवारी उघडकीस घडली होती. दरम्यान बलात्कार झाल्याची पोलिसात तक्रार देणा-या महिलेने नंतर जबाब देताना मात्र आपल्यावर बलात्कार झाला नसून कौटुंबिक वादातून आपण ही खोटी तक्रार केल्याची कबुली दिली, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक मनोजकुमार लोहिया यांनी दिली.

खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना प्रवक्त्या नीलम गो-हे यांनी हा प्रश्न उचलून धरला. सुळे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन दोषींना कठोर शिक्षा व्हावी तसेच हा खटला फास्ट ट्रक कोर्टात चालवावा अशी मागणीही केली होती. चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या दोन अज्ञात चोरांनी विवाहितेवर बलात्कार केल्याची ही घटना होती. घरा शेजारी राहणा-या दिराच्या घराचा दरवाजा अर्धवट उघडा दिसला व आत आवाज येत असल्याने सदर महिलेने घरात कोण आहे हे पाहण्यासाठी शिरली होती. त्या वेळी दोन अज्ञात इसमांनी तिला घरात ओढून घेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल करण्यात आली होती.