आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मावळ येथे वारकऱ्यांचा टेम्पो उलटला, 20 वारकरी जखमी; विविध रुगणालयांत उपचारासाठी दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मावळ (पुणे) येथून दर्शन घेऊन भाविक देहूच्या दिशेने टेम्पोत येत असताना अचानक पायथ्याशी चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो उलटले आहे. ही घटना शनिवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास घडली. या अपघातात 20 भाविक जखमी झाले आहेत. जखमींना विविध खासगी रुग्णालयांमध्ये दाखल केले असल्याची माहिती तळेगाव एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक आर. जे. इंगवले यांनी दिली. 

बीड जिल्ह्यातील वारकरी देहुत शुक्रवारी दाखल झाले होते. वारकरी देहुतून भंडारा डोंगरावर विठ्ठल-रुख्माईच्या मंदीरात दर्शनासाठी टेम्पोत गेले होते. देव दर्शन उरकून देहूकडे पुन्हा परत येत असताना टेम्पोच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच तळेगाव एमआयडीसीचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. 
बातम्या आणखी आहेत...