आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बजाजचा पिंपरीतील प्रकल्पही बंद पाडू, कामगारांचा कंपनी व्यवस्थापनाला इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - बजाज ऑटोच्या चाकण प्रकल्पातील कर्मचा-यांच्या प्रलंबित मागण्या तातडीने मंजूर न केल्यास पिंपरी-चिंचवड प्रकल्पातील उत्पादनही बंद पाडू, असा इशारा कामगार संघटनांनी दिला आहे. चाकणमधील संपाचा शुक्रवारी 11 वा दिवस होता.


दरम्यान, बजाज ऑटोने हा संप बेकायदा असल्याचे सांगत आधीच पुणे औद्योगिक न्यायालयात धाव घेतलेली आहे. श्रमिक एकता महासंघ या कामगार संघटनेने पुण्याच्या अपर कामगार आयुक्तांना निवेदन देऊन या प्रकरणात मध्यस्थी करण्याची विनंती केली आहे. प्रलंबित प्रश्न मार्गी न लागल्यास पिंपरी चिंचवडमधील प्रकल्पांतही काम बंद आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पत्रात आहे.


कर्मचा-यांसोबत केलेला 9 वर्षांचा करारान्वये सध्याचे वेतन 2019 पर्यंत कायम राहील, असे कंपनीतर्फे सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात करारामध्ये दरवर्षी तीन वर्षांनी वेतनवाढ करण्याची तरतूद असून कंपनी त्याची अंमलबजावणी करत नसल्याचा आरोप संघटनेचे नेते दिलीप पवार यांनी केला आहे.


वाळूजला पल्सरचे उत्पादन
संपामुळे बजाजने काही उत्पादन औरंगाबादेत हलवले आहे. वाळूजमधील प्रकल्पात सध्या दररोज 1 हजार, तर चाकणमध्ये 1,100 पल्सरचे उत्पादन होत असल्याची माहिती कंपनीच्या अधिका-यांनी दिली.