आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • We Are Together, Politics Two Days, Modi Said In Pawar\'s Baramati

...तसे आम्ही ‘एकत्र’च; पवारांना मोदींची टाळी, राजकारण दोन दिवसांचे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: कृषी विज्ञान केंद्र परिसराला भेट देताना पंतप्रधान माेदी, शरद पवार, देवेंद्र फडणवीस.
बारामती - राजकारण दोन दिवसांचे असते. वर्षातले उरलेले ३६३ दिवस विकासाच्या कामांसाठी आम्ही मोदींच्या बरोबरच असू, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी देताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या हातावर टाळी दिली. 'पक्षापेक्षा राष्ट्र मोठे, राजनीतीपेक्षा राष्ट्रनीती मोठी. देश पुढे गेला पाहिजे हा आम्हा दोघांचाही एकच ‘मक्सद' आहे,’ असे मोदींनीही सांगून टाकले.

कृषी विकास प्रतिष्ठानच्या सोहळ्यात पवार व मोदी रविवारी बारामतीत एका व्यासपीठावर होते. आपल्यातील मैत्री जुनीच असल्याचे दाखले दोघांनीही दिले. यापुढेही एकमेकांसोबत राहण्याचा मनोदय जाहीरपणे मांडून राजकीय संभ्रम कायम ठेवण्याचे राजकीय चातुर्यही जोडगोळीने दाखवले.

तुम्ही गुजरातेत असताना खूप काम केलेत. कच्छसारख्या वैराण प्रदेशाचा चेहरामोहरा बदलला, अशी मोदींची स्तुती पवारांनी केली. तर मोदी यांनी अनेकांना माहितीही नसेल असे सांगत एक गुपित फोडले. मोदी म्हणाले, 'गुजरातचा मुख्यमंत्री असताना राज्यात अनेक अडचणी यायच्या. केंद्राकडून अनेक अडथळे यायचे. तेव्हा महिन्यातून दोन-तीनदा मी शरदरावांशी बोललो नाही असा एकही महिना जात नसे. केंद्राकडून अडथळे यायचे तेव्हा शरदरावांना मध्ये घालायचो. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून तेही मदत करायचे. याबद्दल मी आज शरदरावांचे जाहीर अभिनंदन करतो.'

पुढे वाचा,बारामतीमध्ये पवारांच्या कार्यक्रमाला मोदी येणार म्हणून मिडियासाठी होता खास दिवस..