पुणे - राज्यभर प्रचारासाठी फिरणारे मोदी येतील आणि जातील, पण नंतर राज्य आम्हाला पाहायचंय, अशा शब्दांत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शुक्रवारी टीकास्त्र सोडले. भाजपने तब्बल ६० उमेदवार आयात केले आहेत. ही सगळी जुळवाजुळवी योजनाबद्ध होती, असा आरोपही त्यांनी पुण्यातील प्रचारसभेत केला.